अकोला-
अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समिती ची संयुक्त बैठक अकोला जिल्हा मराठा मंडळ कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सामुहिक विवाह, कमीत कमी खर्चात लग्न सोहळे, शैक्षणिक, सामाजिक विषयावर मंथन झाले.दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुटीत राज्य स्तरीय मराठा उपवर युवक युवती परिचय मेळाव्या चे आयोजन रविवार दि. २६ ऑक्टोबर ला स्व. नामदेवराव पोहरे स्मृती सभागृह, मराठा मंडळ रामदास पेठ येथे केले आहे.
मुला मुलींचे लग्न जुळविणे ही समाजा समोर एक गंभीर समस्या उभी ठाकली आहे. गेल्या तीन चार दशकां पासुन अकोला जिल्हा मराठा मंडळ व पार्टील बहुउद्देशीय सेवा समितीने या कार्यासाठी पुढाकार घेऊन दरवर्षी उपवर युवक युवतीं चे परिचर संमेलन आयोजित करून एक विचारपीठ उपलब्ध करून दिले आहे. सुरुवातीला जिल्ह्या पुरता सिमित असलेल्या मेळाव्याने आता राज्य स्तरीय रूप धारण केले आहे. शेजारच्या मध्यप्रदेशा, छतीसगढ, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात मधुन मोठ्या प्रमाणात समाज बांधव या मेळाव्यास उपस्थित असतात.
हा राज्यस्तरीय परिचय मेळावा आयोजनासाठी कृषीकीर्तनकार महादेवराव भुईभार, महाबीज चे संचालक डॉ. रणजीत सपकाळ, पाटील बहुउदेशीय सेवा समिती चे सचिव श्रीकृष्ण विखे,अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष दिवाकर पाटील, कोषाध्यक्ष डॉ. विनोद बोर्डे, सचिव डॉ. विवेक हिवरे, सहसचिव श्रीकांत पागृत, सदस्य डॉ.विनीत हिंगणकर, संजय सरप, अनिल राऊत, पंकज देशमुख, निलेश पाचडे, डॉ. निखील बोर्डे, पाटील सेवा समिती चे देविदास कोरपे,सुभाषराव पुंडकर, मनोहर महल्ले, प्रसिद्धी प्रमुख बबनराव कानकिरड,महेंद्र पाटील, अॅड. रामेश्वर खोंड, अशोक बोंद्रे,प्रशांत काळे यांचे सह शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
समाज बांधवांनी उपवर युवक युवती सह सोबत परिचय पत्र,दोन फोटो सह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समिती ने केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....