शासनाने सांस्कृतिक विभागाच्या,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना, थेट मानधन हस्तांतरण योजनेंतर्गत महा.आय.टी. विकासात्मक संस्था डी.बी.टी. द्वारे दरमहा अचूक वेळेवर लाभार्थ्यांना अविलंब (जलदगतीने) मानधन देण्याची योजना आणलेली असून, त्याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या,महाकलासन्मान संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे. परंतु अनेक कलावंताच्या ऑनलाईन नोंदणीमध्ये व्यत्यय येत असल्याने त्यांनी जागरूक राहून, तात्काळ जिल्हा समाज कल्याण कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय वाशिम येथे दिनेशबाबू लहाडके वरिष्ठ सहाय्यक यांची भेट घेऊन त्यांचेकडे आधारकार्ड व आधारकार्डशी संलग्न केलेला स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन व ओटीपी करीता सोबत मोबाईल नेऊन,हातोहात (अविलंब) आपल्या मानधन खात्याचे आधारकार्डचे प्रमाणिकरण (अद्यावत) करून घ्यावे. तसेच आपल्या परिचयातील मृतक लाभार्थी कलाकाराच्या नातेवाईक किंवा वारसदार यांना माहिती देऊन मृतक कलावंताचे मृत्यु प्रमाणपत्र व वारसदाराचे प्रमाणपत्र , आधारकार्ड व मोबाईल क्रमांक देऊन आपले खाते अद्यावत करून घ्यावे. अन्यथा पुढील मानधन रोखले जाऊ शकते किंवा कायमचे बंद होऊ शकते तरी संबंधीत लाभार्थ्यानी सहकार्य करावे.असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .