वाशिम : हल्ली भटक्या जमातीमधील गोंधळी समाजाचा आजकालचे पांचट राजकारणी स्वतःच्या राजकारणा करीता सर्रास उपयोग करतांना दिसत आहेत.हल्ली तर यांचे मोर्चे, आंदोलनं यासाठीही हे स्वार्थी राजकारणी गोंधळ्याच्या गोंधळ जागरणाचा उपयोग करून स्वतःचे चांगभले करून घेत आहेत.मात्र गोंधळी ह्या भटक्या जमातीच्या विकासा करीता एकही मर्दाची औल्याद असलेला राजकारणी पुढे येतांना दिसत नाही.वाशिम जिल्ह्यात गोंधळी समाजाच्या मतदारा पैकी कुणालाही प्रधानमंत्री निवास योजनांचा लाभ म्हणजे घरकुले मिळाली नाहीत. व्यवसाया करीता कर्जपुरवठा होत नाही. नवतरुणांना शासकिय नोकऱ्या नाहीत.गोंधळी समाजाची हक्काची देवी मंदिरे ब्राम्हण समाजाने स्वतःच्या ताब्यात करून घेतलेली आहेत.निजाम काळात गोंधळीपूरा नावाने प्रचलीत असलेल्या गोंधळ्यांच्या वस्त्या मोडकळीस आलेल्या आहेत.वाशिम जिल्ह्यात एकाही शहरात किंवा गावखेड्यात गोंधळी समाजाकरीता सामाजिक सभागृह बांधण्यात आलेले नाही. गोंधळी समाजाचे हक्काचे लोककलावंत मानधन सुद्धा एका दोघा कलावंताचा अपवाद सोडला तर सरसकट सर्वांना सुरु करण्यात येत नाही. त्यामुळे गोंधळी समाजाच्या भावना दुखवील्या गेल्या असून सरकार व सत्ताधारी राजकीय पक्षाविषयी गोंधळी समाजाच्या मनामध्ये आक्रोश आणि असंतोषाचीच भावना आहे.त्यामुळे सन 2024-25 मध्ये होणाऱ्या कोणत्याही सार्वत्रिक निवडणूकीत गोंधळी समाज कोणत्याही राजकिय पक्षाला किंवा एकाही उमेद्वाराला आपला पाठींबा जाहीर करणार नाही. गोंधळी समाजाच्या "रेणूराई" ह्या स्वाभिमानी जातीवंत गोंधळी बांधवाच्या महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे जिल्हा कार्यालय कारंजा (लाड) येथे असून जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गोंधळी लोककलावंत संजय कडोळे हे आहेत.त्यांनी प्रसिध्दीपत्रकात सांगितले की, "आजकाल कुणीही एखादा आमच्या साडेबारा जातीपैकी,जातीचा कि परजातीचा मुलगा येतो.आणि एखाद्या उमेद्वाराला पाठींबा जाहीर करतो.परंतु त्याच्यामागे आमचा कारंजा वाशिम मंगरुळपिर, यवतमाळ येथील रेणुराई गोंधळी समाज जाणार नाही.कारण कदाचित तो एखाद्या उमेद्वारा कडून खोका किंवा खंबा घेऊन असे कळवीत असेल.परंतु असल्या चुकीच्या एकतर्फी निर्णयाला आम्ही कारंजा,वाशिम, मंगरुळपिर,यवतमाळ येथील गोंधळी समाज बळी पडणार नाही तर आम्ही अशा एकतर्फी निर्णयाचा निषेध करीत असून, एकेकाळी शिवछत्रपती शिवराय आणि साताऱ्याचे क्रांतिसूर्य नाना पाटील यांच्या सैन्यातील शूर सैनीक असलेला आमचा जातिवंत खानदानी "रेणुराई" गोंधळी समाज कोणत्याही राजकारणी पक्षाच्या दावणीला बांधला जाऊन,राजकारण्याच्या हातचे बाहुले होणार नाही.आमचा समाज कोणत्याही उमेद्वाराला पाठींबा देणार नाही" तसेच राजकीय उमेद्वारांनी आजतागायत आमच्या भटक्या जमातीची वेळोवेळी उपेक्षाच केलेली आहे.म्हणून आम्ही त्यांना क्षमा करणार नाही.प्रधानमंत्री आवास योजनेमधून तुम्ही साधी घरकुलं,कलावंत मानधन, व्यवसायाकरीता कर्जपुरवठा सुद्धा देऊ शकत नाही तर मग आम्हाला कोणत्या तोंडानी मतं मागता ? मतं मागण्याचा किंवा आमचा पाठींबा मिळविण्याचा तुम्हाला काय अधिकार ?" असा परखड व कडवा सवाल,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा आदर्श नेता राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गोंधळी समाज कायकर्ते संजय कडोळे यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 136