ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट. वेगाने वाहणारे वारे आणि गारपिटीचा कहर."
*कारंजा (लाड)* : नोहेंबरच्या अखेरच्या आठवड्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा हवामान अंदाज,वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या रुई (गोस्ता) या ग्रामखेड्यातील, महाराष्ट्रातील नामांकित पर्यावरण अभ्यासक आणि हवामान तज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दि . १३ नोहेंबर २०२३ रोजीच व्यक्त केला होता.गेल्या दोन तिन दिवसां पासून महाराष्ट्रात कोसळणारा अवकाळी पाऊस पहाता गोपाल विश्वनाथ गावंडे यांचा तो अंदाज १००% तंतोतत खरा ठरला असून गावोगावच्या अनेक शेतकऱ्यांनी अंदाज खरा ठरल्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कळविल्या आहेत.आज महाराष्ट्रात सर्वत्र सुरु असलेला पाऊस भाग बदलत,ढगांचा प्रचंड गडगडाट,विजांचा कडकडाट आणि गारांचा अवकाळी पाऊस येत्या शनिवार दि २ डिसेंबर २०२३ पर्यंत पडणार असून,सर्वत्र ढगाळ वातावरण,गारठा आणि हवेतील गारव्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर राहणार असल्याचे,मंगळवार दि. २८ नोहेंबर २०२३ रोजी आपल्या भ्रमणध्वनीवरून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांनी सांगीतले आहे.तरी शेतकरी बांधवानी हवामान अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे उरकून घ्यावीत.दुपारनंतर शेतात थांबू नये.शेतात उघड्यावर,झाडाखाली किंवा इलेक्ट्रिक खांबाजवळ जनावरे बांधू नये.शिवाय थंडीपासून स्वतःचा बचाव करावा.आरोग्याची काळजी घ्यावी.असे आवाहन करण्यात येत असून,या पाऊसाचा येत्या गहू,हरभरा पिकांना बऱ्याच प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे.