अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन रविवार २८ मे २०२३ रोजी आर.एल.टि. विज्ञान महाविद्यालय अकोला येथे संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री इरावती लागू यांच्या उपस्थितीत स्वर काव्य महोत्सवाचे आयोजन करीत आहे. दिनांक २७मे २०२३ रोजी वृंदावन गार्डन, अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेत्री इरावती लागू, संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे,अनामिका देशपांडे ,भारती शेंडे,जया देशमुख,ब्रिजमोहन चितलांगे,ओंकार गांगर्डे, डॉ.संजय तिडके व विजय कोरडे यांच्या उपस्थितीत दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार व आरोग्यासाठी समर्पित स्वर काव्य महोत्सव बाबत माहिती देण्यात आली.
स्वर काव्य महोत्सवात दिव्यांगांना व्हिलचेअर, व्हाईटकेन, ब्रेल बुक्स व शिष्यवृत्ती चे वाटप,दिव्यांग लिखित कविता संग्रहाचे प्रकाशन, कौशल इनामदार यांची संगीत मैफिल, अभिनेत्री इरावती लागू यांचा रसिकांशी संवाद, संपूर्ण भारतातून आलेल्या दिव्यांग कवींची काव्य प्रस्तुती व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. विशेष म्हणजे दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे सेवाश्री २०२३ पुरस्काराने कौशल इनामदार व इरावती लागू यांना सन्मानित करण्यात येणार आहे.इरावती लागू यांनी आपल्या आव्हानात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने होत असणार्या सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी होत असल्याचे सांगितले आहे.या संस्थेला समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य केले पाहिजे, उत्तरोत्तर संस्थेच्या कार्यात प्रगती होईल , संस्थेच्या स्वागताने भारावून गेली असून, अकोल्यात माहेरपण जाणवते आहे.या सामाजिक उपक्रमाला अकोल्यातील विविध संस्था व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, दिव्यांग नोंदणी आणि कार्यक्रमाच्या प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी संस्थेच्या हेल्पलाइन ९४२३६५००९० क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजन समितीचे अनिरुद्ध देशपांडे, स्वरुप तायडे, आम्रपाली बलखंडे, संजय फोकमारे व मनोज कस्तुरकर यांनी आवाहन केले आहे.