कारंजा - येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात 21 जून रोजी योग दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त दिनांक 21 जून रोजी सकाळी आठ वाजता शाळेच्या मैदानावर वर्ग आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून योगासने शिकवण्यात आली. शाळेचे शारीरिक शिक्षक राजेश शेंडेकर यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले, त्या पाठोपाठ विद्यार्थ्यांनी सदर आसणे केलीत. कपाल भारती, ताडासन, अर्ध चक्रासन, वृक्षासन, भद्रासन, वज्रासन, भुजंगासन आदि आसने विद्यार्थ्यांनी केली. शाळेचे मुख्याध्यापक विजय यांनी आसनांचे फायदे व आसने करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षक राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे शिक्षकेत्तर कर्मचारी देविदास काळबांडे, भालचंद्र कवाने, राजु लबडे, राजेंद्र उमाळे तसेच वर्ग आठवी नववी दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.