कारंजा:- जानोरी येथील साठवण तलाव करीता खाजगी वाटाघाटीद्वारे थेट सरळ खरेदी पद्धतीने जमीन खरेदी करण्यासाठी भूसंपादन निधी उपलब्ध करणे बाबतचा शासन निर्णय पारित कऱण्यात आला आहे.दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक : भूसंपा-२०२४/प्र.क्र. ०९/जल-०४ मंत्रालय, मुंबई या शासन निर्णयात उपरोक्त विषयी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट सरळ खरेदी पद्धतीने जमीन खरेदी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.येथील लोकांनी केलेल्या मागणीची दखल घेत कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी प्रयत्न केलेत त्यास यश आले आहे. साठवन तलाव जानोरी ता. कारंजा जिल्हा वाशीम या प्रकल्पासाठी संपादित केलेली जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट सरळ खरेदी पध्दतीने खरेदी करण्यासाठी मागणी विवरण पत्रानुसार एकूण रूपये 5 कोटी 37 लक्ष 44 हजार रूपये निधी वितरित करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात आहे. दिनांक: ३० जानेवारी २०२४ रोजी मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक : भूसंपा-२०२४/प्र.क्र. ०९/जल-०४ मंत्रालय, मुंबई या शासन निर्णयात या प्रकरणातील थेट खरेदी पध्दतीने जमीन खरेदी करण्याची कार्यवाही विहित नियमानुसार तात्काळ कऱण्यात यावी असे म्हटले आहे . त्यामुळे जमीन खरेदी करण्याची कार्यवाही त्वरित होवुन शेतकऱ्यांची या विषयीची प्रलंबित मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.सदर खरेदी प्रक्रियेची संपुर्ण जबाबदारी सबंधित जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जल संधारण विभाग, वाशीम यांची राहील असे शासन निर्णयात नमूद आहे.या साठवण तलाव बाबत सविस्तर असे की ,राज्य एकत्रित निधीच्या लेखाशिर्ष संकेतांक क्रमांक ४७०२ A०२८ खाली मंजुर असलेल्या साठवण तलाव जानोरी, ता. कारंजा जि. वाशिम या प्रकल्पासाठी संपादित केलेली जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट सरळ खरेदी पध्दतीने खरेदी करण्यासाठी महसूल व वन विभागाच्या संदर्भिय शासन निर्णय / परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी, वाशिम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिनांक ५/१०/२०२३ रोजीच्या बैठकीमध्ये दर निश्चिती करुन मूल्यांकन केले आहे तसेच या साठवण तलाव करीता आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी प्रयत्न केल्याने सदरची जमीन खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी करण्यासाठी शिफारस करण्यात आलेल्या प्रस्तावावर उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.