कारंजा:- तालुक्यातील ग्राम वढवी इथे हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली.तेव्हा ग्रामस्थांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. गावातील संत तुकाराम महाराज मंदिर इथे हे्मेंद्र ठाकरे यांनी प्रथम संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचे मंदिर देहूच्या नंतर केवळ वढवी इथेच असून वढवी हे गाव व गावकरी खरोखर पुण्यवान असल्याचे उदगार काढले व ग्रामस्थाशी मुक्तसंवाद साधला.यावेळी हेमेंद्र ठाकरे यांनी व्यासपीठावर बसने टाळून ग्रामस्थ्यांच्या मध्यभागी बसून मी व्यासपीठावर बसने म्हणजे वेगळा व्यक्ति असणे असा अर्थ होतो तरी मी वेगळा व्यक्ती नसून तुमच्यातीलच असल्याचे सांगून उपस्थित ग्रामस्थ्यांची मने जिंकली व ग्रामस्थानसी विविध विषयावर सखोल चर्चा केली व आपले विचार व्यक्त करताना त्यांनी केंद्रशासन व राज्यशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टीका केली. वाढती महागाई व शेतमालाचे स्थिर भाव यामुळेच शेतकरी त्रस्त झाला असून शेतकऱ्यास दैनंदिन जीवन जगणे सुद्धा अवघड झाल्याचे मत त्यांनी मांडले. आज पुन्हा एकदा शिवरायांच्या शेतकरी धोरणाची समाजाला गरज असल्याचे सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. शिवराय ज्याप्रमाणे आपल्या शेतकरी रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावायचा आदेश आपल्या फौजेला द्यायचे तीच आत्मीयता व शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम आजच्या राजकारण्यांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे परंतु आजचे राजकारणी राजकारण साधण्यासाठी फक्त शिवरायांच्या प्रतिमेचा व मूर्तीचा वापर करतात मात्र शिवरायांच्या विचारांचा त्यांना पूर्ण विसर पडला असल्याचे त्यांनी मत मांडले.
अनेक ग्रामस्थानी सुद्धा थोडक्यात विचार मांडले व हेमेंद्र ठाकरे यांनी कारंजा/मानोरा विधानसभा लढावी व कायम परकीय आमदारांच्या स्वार्थाचे बळी ठरलेल्या या मतदार संघाचा विकास करण्याची विनंती केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस यादवराव शेंडोकार,नामदेवराव कदम,रमेश लसनकुटे,किसनराव एकणार,फकिरा कदम, रामकृष्ण वनारसे, सुभाष लसनकुटे, बाबुलाल कदम,भीमराव पाटील, दिनकर पाटील, जगदेव पाटील,विष्णू लसनकुटे,गोपाल महाजन,उद्धव लसनकुटे, संजय लसनकुटे,भगवान इंगोले, मनोहर वनारसे इत्यादी ग्रामस्थांनी हेमेंद्र ठाकरे यांचे व इतर सहकार्याचे स्वागत केले. तसेच गावचे सरपंच सिद्धार्थ इंगोले व ग्रामपंचायत सदस्य मंडळी यांनी एकत्र हेमेंद्र ठाकरे यांचे स्वागत करून सरपंच सिद्धार्थ इंगोले यांनी हेमेंद्र ठाकरे यांना गावाकऱ्यांच्या वतीने सर्व ग्रामवासी आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासन दिले..
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. पुंडलिक लसनकुटे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार श्री.रमेश लसनकुटे यांनी माणले.
कार्यक्रमांस हेमेंद्र ठाकरे यांच्यासह श्री अनुप ठाकरे, दीपक पाटील, गजानन नगराळे ,सर्वेश खाडे , सतिस शिंदे व शिवाजी ठाकरे यांनी उपस्थिती नोंदविली.