वाशिम : वाशिम जिल्हा निर्मिती पासून,आजता गायत या जिल्ह्याची गणना विकासा पासून कोसो दूर असणारा मागास जिल्ह्याच्या यादीतच होत आलेली असून,हे या जिल्ह्याचे दुदैवच म्हणावे लागेल.तसेच आजपर्यंतच्या मागोव्या वरून स्पष्ट दिसते की,येथील पालकमंत्री हे बहुतांश वेळी पाहुण्या कलाकाराप्रमाणे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला झेंडा फडकविण्याकरीता केवळ प्रमुख अतिथी म्हणूनच राहीले आहेत.त्यामुळे अनेकवेळा स्थानिक ज्येष्ठ व दिर्घानुभवी आमदार राजेंद्रजी पाटणी यांचा मंत्रीमंडळात समावेश व्हावा अशी मागणी कारंजेकरांसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांनी केली आहे. परंतु वरिष्ठांकडून मंत्री मंडळाचा विस्तारच रखडलेला आहे. त्यामुळे जिल्ह्याची विकास कामे ठप्प झालेली आहे. सुशिक्षीत बेरोजगारांकरीता येथे रोजगाराचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. जिल्ह्यात उद्योग धंदे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देणारा एखादा उद्योग सुरु व्हावा अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे. मंत्रीमंडळातील कार्यतत्पर,अभ्यासू,अनुभवी सहकार मंत्री यांना मानणारा खूप मोठा मतदार वर्ग या जिल्ह्यात आहे. शिवाय ना. दिलीप वळसे पाटील कारंजेकरांचे जावाई आहेत. त्यामुळे जिल्ह्यात त्यांचा संपर्क वाढला तर जिल्ह्याचा विकास होईल अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. त्यामुळे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना जिल्ह्याचे संपर्क मंत्री किंवा पालकमंत्री म्हणून नियुक्त करावे.अशी त्यांच्या चाहत्यांची मागणी असल्याचे वृत्त कारंजा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.