कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी गोळा करून ठेवलेल्या जनावरांची पोलिसांनी सुटका केली. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम लिंबा येथील जंगल परिसरात ही 29 जुलै रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपी मजीद खान ऊर्फ माजी खान (५४), अमजद खान मजिद खान (२४) व आयुष मजिद खान (२८, तिघे रा. हिमकीटोला, बालाघाट ) या तिघांनी १३५ जनावरे लिंबा येथील जंगल परिसरात कत्तलखान्यात नेण्यासाठी गोळा करून ठेवले होते. सालेकसा येथील नायक पोलिस शिपाई उदयलाल डोहरे व इतर पोलिसांनी त्या जनावरांची सुटका केली.