वाशिम ( संजय कडोळे जिल्हा प्रतिनिधी) : जिल्हयात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी पेरणीची पुर्व तयारी म्हणुन बियाणे व खते खरेदी करत आहेत. जिल्हयात रासायनिक खताचा तुटवडा कुठेही नाही. जिल्हयात युरीया - १५६४ मे.टन, डीएपी - ६४३८ मे.टन,एमओपी - ३११ मे.टन,एसएसपी-१७०९८ मे.टन,संयुक्त ९ व मिश्र खते - २८३६९ मे.टन एवढया मुबलक प्रमाणात रासायनिक खतांचा साठा आज उपलब्ध आहे.
महिनानिहाय मंजुर आवंटनाप्रमाणे खत साठा उपलब्ध होणार आहे. जिल्हयात कुठेही खताची टंचाई नाही. शेतकऱ्यांनी अनधिकृत कंपन्याचे ग्रामीण भागात फिरत असलेले प्रतिनिधी यांच्याकडुन रासायनिक खतांची खरेदी करु नये. परवानाधारक विक्रेत्यांकडुन खरेदी करण्यात यावी.
अनधिकृत निविष्ठा विक्रीबाबत लक्ष ठेवण्याकरीता सर्व सहा तालुकयामध्ये भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. एक जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. कोणत्याही नागरीक व शेतकऱ्यास बनावट खते विना पावतीने, जादा दराने वा संशयास्पद विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत कृषि विभागाच्या संनियंत्रण कक्षाला ९४०४३३८२१६ व ९४०४२५२६७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.