देव बरोबर करते ! या विषयावर मला सुचलेला विचार मी आपणासमोर मांडत आहे. मी एके दिवशी टॕक्सीत बसलो असता, मला टॕक्सीचे पाठीमागे "देव बरोबर करते" असे लिहिलेले दिसले. मी बराच विचार केला. लिहाणाराने हे अगदी बरोबर लिहिले.
जैसा कर्म करेगा ।
वैसा फल देगा भगवान ।
यह है गीता का ज्ञान ।।
उदाः- एके दिवशी तीन भाऊ प्रवासाला निघाले असताना त्यांना एक शेतकरी साथीला भेटला. चालत असताना दुपारचे १२ वाजले. त्यांना भूक लागली. तिघे भावांनी शेतकऱ्यांस गावात जाऊन जेवण घेऊन येण्यास सांगितले. शेतकऱ्याने गावातून जेवणाची सोय केली. परत त्याला पाणी आणायला सांगितले. या तिघांनी पूर्ण जेवण करुनही टाकले. शेतकरी पाणी घेऊन आला तर त्याच्या करिता काहीच जेवण शिल्लक ठेवले नाही हे त्याला कळले. परत ते तिघे भाऊ शेतकऱ्यांस म्हणाले, आता तू लाडू घेऊन ये. शेतकरी गावात जाऊन लाडू घेऊन येत असताना त्याने अर्धे लाडू आधीच खाऊन टाकले व फक्त दोनच लाडू ठेवले. ते दोन लाडू तिघांना देत असताना ते म्हणाले, तुझ्याकरिता लागेल ना ! त्याक्षणी शेतकऱ्याने ताबडतोब पूर्ण लाडू खाऊन टाकले. म्हणूनच म्हणतो, "देव बरोबर करते"
"बुरे कर्म का फल बुरा होता है ।"
आपण नेहमी विचार केला पाहिजे की, आपण चांगले कर्म केले तर देव आपले बरोबरच करेल. वाईट कर्म केले तर देव आपले बरोबर न करता वाईटाचे फळ वाईटच वाईटच मिळणार.
जगी ज्याचे कोणी नाही ।
त्यास देव आहे ।।
उदाः- एके दिवशी रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणाली, देवा ! आपण जगाचे पालनपोषण करता ना? आज जगात कुणी उपाशी तर राहिला तर नाही ना? देव म्हणाले की, सर्व जगातील प्राण्यांचे जेवण झालं आहे. रुक्मिणी म्हणाली, देवा ! एक प्राणी जेवायचा राहिला आहे. देव म्हणाले कोणता? रुक्मिणी म्हणाली, देवा ! मी एका डबीत मुंगळा बंद केला तो आता उपाशी आहे. देव म्हणाले, तो सुद्धा उपाशी नाही. रुक्मिणीने डबीचे झाकण काढले तर काय ! मुंगळ्याचे तोंडात तांदळाचा दाणा होता. हे कसे घडले. जेव्हा रुक्मिणीने डबीत मुंगळा बंद करते वेळी रुक्मिणीचे कपाळावरील कुंकवात अक्षद लावलेली होती, त्यातील एक तांदळाचा दाणा डबीत पडला होता. म्हणूनच म्हणतो, "देव बरोबर करते."
"देव बरोबर करते" हे वाक्य अगदी विचार करायला लावणारेच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
सारी दुनियाका तूही करणधार है ।
बिना तेरे ना किसीको लगापार है ।।
या जगाची काळजी परमेश्वरालाच आहे. त्याला आत्मसात करा. देव सर्वांचे नक्कीच बरोबर करील. देव वाईटाचे भले कधीच करणार नाही.
जैसे ज्याचे कर्म तैसे ।
फळ देतो रे ईश्वर ।।
म्हणून तर चांगले कर्म करीत रहा. फळ देणे त्याचे हातात आहे. हे सुंदर विचार मला सुचला व लेखन केले. देव बरोबर करते या तीन शब्दात ओतप्रोत आध्यात्म भरलेले आहे. कुणाचे वाईट होऊ नये. सर्वांचे चांगले होवोत. हा विचार मनात बाळगा . जयगुरु !
लेखकः-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....