कारंजा :(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, नुकताच करंजमहात्म्य परिवाराकडून,कारंजा मानोरा तालुक्यातील मंडल विभागाचा (सर्कल निहाय) सर्व्हे करण्यात आला असून,कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघात, भाजपाचा मोदी प्रभाव कायम राखण्यात विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.गेल्या सहा महिन्यापासून,सातत्य राखून कारंजा मानोरा मतदार संघातील नागरिकांच्या भेटी गाठी व संवाद, विशेष करून रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात यशस्वी ठरल्यामुळे, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या प्रती उत्साहाचे वातावरण निरिक्षणाअंती,आमच्या प्रतिनिधींनी नोंदविले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत परत एकदा त्यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.विरोधी पक्षात सुसूत्रता नसणे हे ही त्यामागचे कारण सांगता येत आहे.शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीचाही त्यांना लाभ मिळू शकतो.परंतु ह्या ठिकाणी एकच नमूद करावेसे वाटते की,एकास एक उमेद्वारामध्ये विधानसभा निवडणूक जर झाली.तर मात्र तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. परंतु विरोधी पक्षाचे एकीकरण होऊन विरोधी पक्ष एकमेव उमेद्वार देणे कठीण आहे. यवतमाळ वाशिम मतदार संघाबद्दल सांगायचे झाल्यास, गेल्या काही माहिन्यापासून विद्यमान खासदार भावनाताई मतदार संघात सक्रिय झाल्याचे दिसून येत असून,गेल्या काही दिवसात नांदेड-वाशिम यवतमाळ वर्धा रेल्वेचा प्रश्न असो की, शेतकर्याचे प्रश्न असो, लोकसभेत त्या आवाज बुलंद करीत आहेत.शिवाय सध्या यवतमाळ वाशिम मतदार संघात, सक्रिय असणाऱ्या पाटील समाजातील त्या एकमेव नेत्या आहेत.सध्या महाराष्ट्रात शिंदे गट शिवसेना आणि भाजपा महायुती असल्यामुळे परत एकदा महायुतीकडून त्यांनाच उमेद्वारी देऊ जाऊ शकते.आणि तसे जर झाले तर भाजपा पक्षाकडे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिल्या जाऊ शकते.आणि विरोधी पक्षाकडे तुल्यबळ उमेद्वार नसल्यास पुन्हा एकदा जनमताचा कौल विद्यमान खासदार भावनाताई गवळी यांचेकडे जाऊन त्यांचाच विजय निश्चित मानल्या जात असल्याचे करंजमहात्म्यच्या निरिक्षणातून स्पष्ट झाले आहे.