कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ):- 2 सप्टेंबर 2023 रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अचानक भेट दिली रुग्णालयातील स्थितीचे, व्यवस्थेचे प्रत्यक्ष पाहणी यावेळी करण्यात आली .या ठिकाणी रुग्णांना योग्य उपचार व त्यासाठी लागणारे साधनांचा वापर होतो की नाही याची शहानिशा प्रत्यक्ष रुग्णांना भेटून करण्यात आली. औषधोपचाराची माहिती यावेळी घेण्यात आली. रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना प्रत्यक्ष भेटून त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची माहिती घेण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना आमदार राजेंद्र पाटनी यांनी रुग्णांना योग्य ती सेवा देण्याचे निर्देश दिलेत. रुग्णसेवेत कुचराई करणाऱ्या कोणतेही कर्मचाऱ्यास माफ केले जाणार नाही अशी ताकीद यावेळी दिली. आ. राजेंद्र पाटनी यांच्या अचानक भेटीने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तारांबळ उडाली . आमदारांच्या कडून होणाऱ्या प्रश्नांच्या सरबत्तीने येथील उपस्थित कर्मचारी अनुत्तरीत झाल्याचे दिसत होते. येथील परिस्थिती पहात नेमके मर्मावर बोट ठेवत आमदारांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. आ. राजेंद्र पाटनी यांच्या अचानक भेटीने रुग्ण आणि रुग्णालयातील नातेवाईक यांनी समाधान व्यक्त करत आमदारासी संवाद साधला. आ. राजेंद्र पाटनी यांच्या सोबत तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, ज्ञायकभाऊ पाटणी,भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिद्धीप्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्विय सहाय्यक यांनी कळविले.