गडचांदूर शहरातील बसस्थानकाजवळ पायी चालत असलेल्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल घडली.
महादेव बावणे 60 रा. बाखर्डी असे मृतकाचे नाव आहे. महादेव बावणे हे शेतीच्या अवजारांच्या कामाकरीता गडचांदूर येथे आले होते. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत महादेव खाली कोसळला. डोक्याला मार लागल्याने उपस्थितांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अज्ञात वाहनाचा तपास गडचांदूर पोलिस करीत आहे.