कारंजा लाड (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) येथील अण्णा भाऊ साठे चौक येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांची जयंती येथील सर्वजातीधर्मसमाविष्ट अशा एकमेव सामाजिक समता प्रबोधन मंच तर्फे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सर्व प्रथम सामाजिक समता प्रबोधन मंचचे संस्थापक हंसराज शेंडे, माळी समाजाचे जेष्ठ समाज सेवक श्रीकृष्ण बोळे,शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गजानन आमदाबादकर,डॉ कुंदन श्यामसुंदर, से.नि. ग्रामविस्तार अधिकारी सुधाकर जाधव यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांचे चौकातील फलकाचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक ज्ञानेश्वर खंडारे यांनी केले अँड ज्योती दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते अँड संदेश जिंतूरकर,डॉ. रमेश चंदनशिव , संजय बाजड, प्राचार्य टी. व्ही. राठोड,अनिल डेरे ,गजानन अमदाबादकर यांनी अण्णाभाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या दमदार भाषणात ये आझादी झुठी हैं ।इस देश कि जनता भुखी हैं ॥ असे अण्णा भाऊ साठे म्हणाले होते. हे कटूसत्य आज प्रत्यक्षात आपण अनुभवत असल्याचे सांगीतले.अण्णाभाऊ यांनी अनेक कादंबरी लिहिल्या.अनेक नाट्य लिहीले.सर्वप्रथम रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गाणारे हॆ पहिले शाहीर होत.माझी मैना गावाकडे राहिली ही लावणी त्यांनी मुंबई महाराष्ट्रातच राहावी म्हणून गायली. असे मार्गदर्शकांनी सांगीतले. या कार्यक्रमाला सर्व समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते अनिल डेरे अँड विजय छल्लाणी, विकास गवई , डॉ. महेंद्र खरतडे, सुरेशआप्पा कुकडे ,विनोद दाभाडे , धनराज जोंधळे, विजय वानखडे,आदित्य खंडारे, विजय इंगळे, विजय डांगे बार्टी कमल किशोर भगत, गजानन पवार दादारावं सावते विठ्ठल लोंढे दशरथ सावळे, कु दाभाडे ताई, गढवाले भाऊ, कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक पद्मगिरवार सर यांनी तर बार्टीच्या समतादूत प्रणिता दसरे यांनी आभार प्रदर्शन केले