भद्रावती- तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी मा श्री डॉ प्रकाशजी महाकाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड सर यांच्या अध्यक्षतेखाली ढोरवासा केंद्र अंतर्गत जि.प. उ. प्राथ. शाळा गवराळा येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला केंद्रातील जि.प. शाळेचे 11 व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेचे 2 मुख्याध्यापक उपस्थित होते.
आजच्या सभेत विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले त्यात प्रामुख्याने MMSSS टप्पा 2 मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा स्पर्धा यामध्ये सविस्तर मागील मुल्यामापन व यावर्षीचे मुल्यमापन मध्ये गुणांकाचे स्वरुप याबाबत चर्चा करण्यात आली तसेच पायाभुत सुविधा 33 गुण, शासन ध्येय धोरण 74 गुण व शैक्षणिक संपादन 43 गुण असे मुल्यमापनाचे एकुण गुण 150 यावर मुल्यमापन होणार आहे. प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यात आली. 5 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत केंद्रातील सर्व शाळाचे मुल्यमापन होणार आहे. फाईल अद्यावत ठेवण्यात यावी. गणेवश, बुट व सॉक्स सर्व लाभार्थ्यांना वाटप करणे व सदर रेकार्ड अद्यावत करणेबाबत चर्चा करण्यात आली. सन 2024-25 या सत्रातील सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती लाभार्थ्यांचे सर्व कागदपत्रे अद्यावत करुन सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी दिनांक 31 ऑगष्ट 2024 ला केंद्र स्तरावर जमा करण्यातबाबत सुचना देण्यात आल्या.
पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धेमध्ये केंद्रातील सर्व शाळांनी भाग घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक 1 ते 20 ऑगष्ट 2024 पर्यत शाळास्तरावर भेटीमध्ये ज्या त्रृटी आढळून आल्या त्या पुर्ण करावे. दिनांक 21 ते 31 ऑगष्ट 2024 ला त्रीसदस्यीय समिती द्वारे प्रत्यक्ष पुर्नमुल्यांकन होणार आहे. शाळाभेटीतील 16 मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. UDISE मध्ये शिक्षक माहिती प्रोफाईल अपडेट करणे याबाबत सुचना देण्यात आल्या. 31 जुलै पटसंख्या संवर्गनिहाय व इयत्तानिहाय हार्डकॉपी केंद्रस्तरावर सादर करण्यास कळविण्यात आले. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे करारनामा व मेडीकल सर्टीफिकेट मुख्याध्यापकांनी त्वरीत एक प्रत केंद्र स्तरावर जमा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
कब-बुलबुल व स्काउट गाईड नोंदणी अनिवार्य आहे. कमी पटसंख्येच्या शाळांनी कब-बुलबुल यामध्ये नोंदणी करण्यात यावी. विनोबा भावे ॲप मध्ये केंद्रातील जि.प. सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी नोंदणी केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन करण्यात आले. शासन आदेशानुसार निपुण शाळा घोषीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिष्यवृत्ती / नवोदय परीक्षा यासंदर्भात शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सराव नियमित सुरु ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
नवभारत साक्षरता अभिान अंतर्गत गावातील असाक्षरांची माहिती घेण्याबाबत व त्यांचे नोंदणी झालेले व न झालेले याबाबत चर्चा करण्यात आली. NEP – 2020 याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. HAPPINESS INDEX प्रत्येक देशाची तुलना PISA, NAS SLAS, ASER यावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. दफ्तरविना शाळा उपक्रम यामध्ये स्पोकन इंग्लिश व विज्ञान प्रयोग हा विषय प्रत्येक शनिवारला घेणे अनिवार्य तसेच अवांतर उपक्रमसुद्धा घेणेबाबत सुचना करण्यात आल्या.
डिजीटल विद्यार्थी हजेरी घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या. इको क्लब, प्रहरी क्लब, शिक्षण सप्ताह याबाबत रेकार्ड अद्यावत करण्याचे सुचना देण्यात आल्या. CHATBOX मध्ये PAT चे गुण अनिवार्य असल्याबाबत सुचना देण्यात आल्या. मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी शाळेच्या वेळेबाबत वक्तशीरपणा असण्याबाबत सुचना करण्यात आल्या.