जन सेवा हीच ईश्वर सेवा आत्मसात करून प्रा.प्रकाश बगमारे यांनी एका वृध्द इसमाला मदतीच हात दिला.शहरातील अत्यंत वर्दळीच्या ख्रिस्तानंद हॉस्पिटल जवळच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात दोन दिवसापासून एक अनोळखी वृद्ध पुरुष आजाराने फणफणत होता. त्याकडे येणारे जाणारे पहात होते. त्याला लवकर वैद्यकीय सुविधा मिळाली नाही तर त्या गरीब व्यक्तीचा प्राण जाण्याची शक्यता होती. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रा प्रकाश बगमारे
हे काही कार्यकर्त्यांसह त्या चौकात गेले असता त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्बुलन्स ला बोलावलं आणि डॉ राहुल मेश्राम व त्यांच्या पत्नी यांच्या माध्यमातून प्राथमिक उपचार करून नंतर ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे त्याला रवाना केले .याप्रसंगी गुजराती भोजनालय चे उमेश पटेल , जीभकाटे, जयघोष सहारे, मिलिंद राऊत आणि रमेश रिक्षावाला यांनी विशेष सहकार्य केले .प्रा प्रकाश बगमारे यांच्या समय सूचकता व रुग्णांची सेवा करण्याचा सेवाभाव यामुळे त्या अनोळखी इसमाला वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली .त्यांच्या या कृतीबद्दल सर्वत्र प्रा प्रकाश बगमारे व डॉक्टर राहुल मेश्राम यांचे धन्यवाद मानले जात आहे . ख्रिस्तानंद चौकातील महालक्ष्मी मेडिकल स्टोअर्स जवळच्या बंद शटर च्या पायऱ्यावर दोन दिवसापासून अन्न पाण्याविना तो रुग्ण पडून होता .त्याला वेळीच उपचार मिळाल्यामुळे निश्चितपणे त्याला प्राण वाचवण्यात महत्त्वाचे भूमिका या कार्यामुळे पार पडली असे तेथील उपस्थित मंडळी व्यक्त करीत होते