आरमोरी पोलीस यांची अवैध दारू विक्री संदर्भातील मोहीम सक्रिय ठेवीत दिनांक 05/03/2025 ला दुपारी 3 वाजता दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरमोरी शेगाव टोलीवर चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्याच्या घरी प्रोव्ही रेड केली
अवैध दारू विक्रेत्याच्या घरी एका प्लास्टिक थैलीत रॉयल कंपनीची लेबल असलेली विदेशी दारू एक नग दोन लिटर समतेच्या रॉयल कंपनीची प्लास्टिकची सीलबंद विदेशी दारू एक बॉटल,अवैधरीत्या विक्री किंमत 3000/रु, प्रमाणे,500 एम एल मापाच्या टिनाचे एकूण 12 नग Hayards 5000 या कंपनीची लेबल असलेली विदेशी बियर प्रती नग विक्री किंमत 300/- रुपये प्रमाणे असा 3600/- रुपये . असा एकूण 6600/- रुपयाचा माल तपासदरम्यान मिळाला.अवैध दारू विक्रेत्याचे नाव आशिष वामन निंबेकर वय -40 वर्ष रा. शेगाव टोली आरमोरी येथील असून त्याच्यावर अप.क्र.068/2025 कलम 65(ई ) म.दा.का.गुन्हा नोंदविला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पो नि. कैलास गवते, यांच्या मार्गदर्शनाखाली Asi/1828 नीलकंठ कोकोडे पोस्टे-आरमोरी यांच्याकडे देण्यात आला.