वाशिम: कारंजा शहरामध्ये,स्थानिक सकल हिंदु समाजातर्फे विराट अशा एकजुटीचे प्रदर्शन करीत, शनिवार दि. 31 ऑगष्ट 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता, कारंजा नगरीतील श्री काण्णव मोठे श्रीराम मंदिरा मध्ये,प्रभू श्रीरामाचे पूजन,हारार्पण व दर्शन करून,सर्वपक्षीय सकल हिंदु समाज कारंजेकरांतर्फे सकल हिंदू समाज मोर्चाला सुरुवात करण्यात आली.मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे आपआपसातील राजकीय कुरघोडी,पक्षभेद पंथ-प्रांत-जाती-भाषा भेद दूर सारून,आबाल वृद्ध तसेच राव रंकानी आपल्या माता-बहिनीसह तन-मन-धनाने राष्ट्रभक्तीच्या प्रेरणनेने सहभागी होऊन मोर्चामध्ये जबरदस्त शांती,संयम व शिस्तीने मुकमोर्चाचे विराट जनसागराचे उपस्थितीत प्रदर्शन केले.
याबाबत अधिक वृत्त असे की,बांग्लादेशामध्ये हिंदूवर होत असलेले अनगिनत अत्याचार आणि बांग्लादेशातील हिंदूंच्या हत्या ; देशात होणारी बांग्लादेशी रोहिंग्याची घुसखोरी ; हिदूंच्या लेकीबाळींवर जिहाद्याकडून होत असलेले अत्याचार आणि लव्ह जिहाद इत्यादी वाईट व अनुचित कृत्याचा सामुहिक निषेध करण्यासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदहू मोर्चाला पाठींबा देण्यासाठी शहरातील बहुतांश व्यापारी मंडळीनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून समर्थन दिले.
सदर मोर्चा रामा सावजी चौक - महात्मा फुले चौक-संत गाडगे बाबा चौक-जयस्तंभ चौक जुने बस स्टॅन्ड मार्गाने तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. तहसिल कार्यालयावर मोर्चा पोहोचताच शिष्टमंडळाकडून तहसिलदार कुणाल झाल्टे यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.वंदे मातरम् गीताने मोर्चाची सांगता करण्यात आली.
विशेष म्हणजे मोर्चामध्ये ठिकठिकाणी आणि तहसिल कार्यालय येथे पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था आणि मसालेदार खिचडीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
मोर्चा दरम्यान, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे आणि स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात कारंजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी पोलीसवृंद,राखीव पोलीस,दंगा पथक,वाहतूक पोलीस,गृहरक्षक दल इ.चा तगडा बंदोबस्त ठेवून चांगले सहकार्य दिले.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिले आहे.