वाशिम : राज्य सरकारने " राज्यातील तमाम माता भगीनी यांना लाडकी बहिण मानून, त्यांच्या हातातही पैसा जावून त्यांचा आर्थिक विकास व्हावा म्हणून दरमहा लाखो बहिनींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये देणारी लाडकी बाहिन योजना आणली.ही निश्चितच प्रशंसनिय योजना असून त्याबाबत महायुती सरकारची जेवढी प्रशंसा कराल तेवढी कमीच आहे.परंतु महत्वाचे म्हणजे लाडकी बहीण या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी. लाडकी बहीण या व्यापक योजनेने,तळागाळातील सर्वसामान्य बेघर-निराधार -वयोवृद्ध-दिव्यांग-महिलांच्या इतर योजनाचे पैसे रखडले असल्याने त्या योजनेचे दिवाळे काढले आहे. शासनाने सर्वसामान्यांच्या इतर लाभाच्या योजनाचा सर्वच निधी,लाडकी बहिन योजनेसाठी हस्तांतरीत केलेला आहे.परिणामी शासनाच्या जनसामान्यांच्या इतर योजना मोडकळीस निघणार काय ? बंद केल्या जाणार काय ? शासन आता प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजना,श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना व बाकी सामाजिक न्याय विभाग व सांस्कृतिक योजनेकरीता निधी केव्हा उपलब्ध करणार ? असे प्रश्न निर्माण झाले असून,मासिक मानधनाची प्रतिक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांना गेल्या दोन महिन्याचे मानधन मिळणार तर केव्हा ? असा सवाल करीत,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष आदर्श समाजसेवक संजय कडोळे यांनी या बाबत सर्व आमदारांनी विधानसभा विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी प्रश्न मांडून चर्चा घडवून आणावी असे म्हटले आहे. तसेच शासनाने, "प्रधानमंत्री आवास योजना,संजय गांधी अनुदान योजना,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन योजनेकरीता निधी उपलब्ध करून देवून सामाजिक न्याय विभाग सांस्कृतिक विभागाच्या लाभार्थींना लवकरात लवकर मानधन मिळवून देण्याची मागणी केली आहे.