भोजाजी महाराज तीर्थक्षेत्र असलेले आजनसरा ते वरोरा येथे जाणारी बस मागील मागील एक वर्षापासून बंद होती वेगवेगळे कारण देत एसटी महामंडळ बस बंद ठेवत होते. त्यामुळे भोजाजी महाराज भक्तांना आजनसरा येथे जाण्यासाठी फार मोठी अडचण जात होती. भाविक भक्त दर्शना पासून वंचित राहत होते.आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थान मंडळाचे पदाधिकारी व वरोरा तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी आमदार करण संजय देवतळे यांची भेट घेतली असता त्यांना वरोरा ते आजनसरा तसेच आजनसरा ते वरोरा ही बस सुरू करण्यात यावी ही विनंती चे निवेदन देण्यात आले.त्यावेळी लगेच आमदार करण देवतळे यांनी डेपो मॅनेजरला पत्र देऊन व प्रत्यक्षात फोन करून त्वरितआजनसरा बस सुरू करावी असे सांगण्यात आले.व आज लगेच आजपासून (१ जानेवारी )वरोरा ते आजनसरा ही बस सकाळी ८. ३० वाजता व दुपारी १. ३० वाजता असे दोन वेळी बस सुरु करण्यात आली.
त्यामुळे भाविक भक्तांमध्ये आनंदा चे वातावरण निर्माण झाले आहे. वरोरा येथून दोन बसेस सुरू झाल्यामुळे भाविक भक्तांनी आमदार करण देवतळे यांचे आभार व धन्यवाद मानले तसेच डेपो मॅनेजर वर्धेकर यांचे सुद्धा आभार देण्यात आले.