ब्रम्हपुरी:-
आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटने मार्फत सण २०२३ - २४ मध्ये घेण्यात येणाऱ्या ऍथलेटिक्स स्पर्धा ब्रम्हपूरी तालुक्यातील बेटाळा येथील महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वतीने नागपूर विभागातील पॉलिटेक्निक व फार्मसीच्या विद्यार्थ्यांकरिता दि. ०५ ते ७ फेब्रुवारी २०२४ रोजी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
सदर स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संकुल ब्रम्हपुरी येथे करण्यात आले होते. यात १०० मीटर, २०० मीटर, ४००मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ४x १०० रिले, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक व भाला फेक या सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास पूर्व विदर्भातील ३५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून बेटाळा येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.सुयोग बाळबुधे हे होते. तर उद्घाटन प्रा.राचलवार विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा संयोजक श्री गोपाल भानारकर, प्रा.संजय मगर संचालक स्टडी सर्कल अकॅडमी, प्रा.विशाल लोखंडे प्राचार्य महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी, बेटाळा, प्रा. नरेंद्र समर्थ विभागप्रमुख यंत्र अभियांत्रिकी महाराष्ट्र इन्स्टि. ऑफ पॉलिटेक्निक बेटाळा, क्रीडा संयोजक प्रा.रजत बागडे, प्रा.यादव कोसे उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पॉलिटेक्निकचे संस्थापक प्रा.देवेंद्र पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले . या स्पर्धेकरीता क्रीडा प्रशिक्षक श्री विनोद दिवटे, श्री राहुल जुआरे, श्री गोविंद करंबे, श्री शैलेश भैसारे, श्री गौरव करंबे ,रोहित बरडे,श्री.प्रदीप भैसारे, श्री कुंदन गायकवाड यांनी पंचाची भूमिका पार पाडली. उदघाटनाचे सुत्रसंचलन प्रा.गिरीश साखरे सर तर प्रास्ताविक प्रा.नरेंद्र समर्थ व आभार प्रदर्शन प्रा.रुपेश ढोरे यांनी केले. बक्षीस वितरणाचे सुत्रसंचलन प्रा. राहुल उके सर तर आभार प्रा.असद शेख यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सर्व प्राध्यापक वृंद,विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....