नगरसेवक मंगेश भाऊ काळे मित्र मंडळ व निर्भय बनो जण आंदोलनाच्या वतीने तुकाराम चौक ते मलकापूर हा खराब झालेला खड्डामय रस्ताची दुरुस्ती व्हावा म्हणून त्याचे त्वरित काम करण्यात यावे म्हणून दिनांक 29 जानेवारी 2024 पासून तुकाराम चौकात आमरण उपोषण व साखळी उपोषण चालू आहे .मागण्या पुढील प्रमाणे आहेत १) संत तुकाराम चौक ते मलकापूर रोडचे तात्काळ काम सुरू कारणे.२) नळाची रोडच्या मधील पाईपलाईन स्थलांतरित करण्यात यावी ३) डिव्हायडर मधील स्टेट लाईट तात्काळ लावण्यात यावे. याकरिता सहा दिवसापासून तीन सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे हे आमरण उपोषण,अन्नत्याग आंदोलन व सेकडो कार्यकर्ते साखळी उपोषण करीत आहेत . परंतु बांधकाम विभाग मनपा आयुक्त जिल्हाप्रशासन अधिकारी या शांततेच्या , अहिंसेच्या, लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे दिनांक 4 जानेवारी 2024 रविवार ला मलकापूर बंद चे आव्हान करण्यात आलेले आहे. त्या आवाहनाला स्थानिक व्यापारी दुकानदार यांनी आपले दुकान प्रतिष्ठान बंद ठेवून आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवक मंगेश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.