नागभीड :डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे अवचित्त साधून नागभीड तालुक्यातील जनकापूर येथे 14 एफ्रिंल ला भव्य अशा भीम रॅली चे आयोजन करण्यात आले होते.गेले २ वर्षे सतत कोरोना मुळे महामानवाची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली पण या वेळी खूप मोठया उत्साहात व गाजावाजात जयंती साजरी करण्यात आली. बौध्द समाज जनकापूर यांचे वतिने आयोजीत या कार्यक्रमात युवा वर्ग व महिला वर्ग खूप मोठया प्रमाणात उत्साहाने हातात निळे झेंडे व डोक्यावर निळे फेटे परिधान करून बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत सामील झाले.तत्पूर्वी बौद्ध उपासक ईश्वर गणविर यांनी डाँ.बाबासाहेब आबेडकर यांचे तैलचित्रांला मानवंदना देवून मिरवनुकीला सुरवात करण्यात आली.ती वाजतगाजत डाँ.आंबेडकर चौक, गोवर्धन चौक, ग्रा.प.चौक, जि.प.शाळा, ते बौद्धविहार जवळ येवून समोरोप करण्यात आला. ग्रामपंचायत येथिल डाँ. आंबेडकर यांचे प्रतिमेला सरपंच वैशाली गायधने,अगंनवाडी सेविका बेबिताई बोरकर, उपसरपंच महेश रामटेके, वर्धिनी देवता सुर्यंवंशी, ग्रा.प.सदस्या शारदा सुर्यंवंशी, शुभांगी डाहारे, लक्ष्मी मसराम यांनी पुष्पहार अर्पण करू अभिवादंन केले.तर जि.प.शाळेतील प्रतिमेला शाळा समितीचे राहुल रामटेके यांनी पुष्पहार घालून अभिवादंन केले.बौद्ध समाज अध्यक्ष रामदास सुर्यवंशी यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी समाजाचे सचिव पंकज रामटेके, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सचांलन राहुल रामटेके यांनी तर बौद्धपुजापाठ महेश रामटेके यांनी केली. उपस्थिताचे आभार अरविंद चदंनखेडे यांनी मानले.यावेळी शेकडोच्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते युवा वर्ग व महिला वर्ग यामध्ये सहभागी झाले..जयंतीचे अवचित्ते साधून ठीकठिकानी सरबतांचे वाटप करण्यात आले. यावेळी सगळीकडे उत्सहाचे वातावरण दिसून आले.याप्रसंगी सर्वांनी मोलाचे सहकार्य दिले.