कारंजा (लाड) : संपूर्ण जून महिना उलटून,जुलै महिन्याचा प्रारंभ होऊन चार दिवस उलटूनही कारंजा परिसरात चांगला पाऊस झाला नसल्याने व हवेतील उकाडा कमी होत नसल्याने शेतातील पिकासाठी स्प्रिंकलर लावण्याची वेळ आल्याने पेरणी आटोपून, चांगल्या पावसाची प्रतिक्षा करीत असलेल्या बळीराजाला अखेर, गुरुवार दि. 04 जुलै 2024 रोजी सायंकाळी 07:00 दिलासा देणारा मुसळधार पाऊस कोसळला.त्यामुळे हा पाऊस रात्रभर चांगला कोसळेल असा अंदाज दिसत आहे.सदर पावसाने मात्र नगर पालिकेच्या नियोजनाचे चांगलेच वाभाडे निघाले असून, रस्त्यांना नदीनाल्याच्या पुराचे स्वरूप आल्याचे चित्र डॉ . आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, नेहरुचौक, जुना सरकारी दवाखाना, महात्मा फुले चौक, रामा सावजी चौकात दिसून येत होते. त्यामुळे अचानक झालेल्या मुसळधार पावसाने बाजारपेठेतील नागरिकांना रस्त्यावरील पुरामधून वाहने काढतांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. यावेळी झोपडपट्टी मधील अनेक घरा मध्ये पाणी शिरल्याने गोरगरीब लोकांच्या अन्नधान्य कपड्यालत्त्याचे नुकसान झाल्याचे वृत्त मिळाले आहे. यावेळी जिल्हयातील एकमेव हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दिलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्या बद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी,त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.तर शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याने आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले.