कारंजा : तालुक्यातील ग्राम खेर्डा जीरापुरे येथील मृतक सोनाली कोडापे रा.खेर्डा (जिरापुरे) यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नात सदर महिलेची हत्या करण्यात आली होती कारंजा शहर पोलिसानी एका दिवसात तपासाचे चक्र फिरवुन आरोपीना गजाआड केले असले तरी अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या बाबतची निवेदन पोलिस निरीक्षक कारंजा (लाड) व कारंजा तहसील कार्यालयात तहसीलदार यांना अखिल भारतीय विकास परिषद वतीने मुक मोर्चा काढून दिनांक ०७/०१/२०२५ रोजी सादर करण्यात आले सविस्तर वृत असे की,वाशिम जिल्हयातील कारंजा (लाड) पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे ग्राम खेर्डा (जिरापुरे) या गावातील सोनाली कोडापे (वय ३४ वर्ष) आदिवासी महिला दिनांक ०३/०१/२०२५ ला सकाळी बकऱ्या चारण्या करीता जंगलात गेली असता दुपारी तिच्या रक्ताच्या धारोळ्यात संशयास्पद मृतदेह आढळा असून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय येत असून महिलेने अत्याचाराचा प्रतिकार . केल्याने कोयत्याने तिच्यावर अनेक वार केल्याचे दिसून येते आहे सदर महिलेला दोन चिमुकली मुले असून घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे अखिल भारतीय विकास परिषद सदर घटनेचा निषेध करत सदर चौकशी करून अजून काही आरोपी आहेत का ? याचा शोध घ्यावा या प्रकरणात दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी करिता मोर्चेत बहुसंख्येत महिला व पुरुष वर्ग हजर होते.