अकोला- ताणतणावांना टाळत निरामय स्वास्थ्यासाठी शांत झोपेचे महत्व ओळखून त्यासाठी आहार विहार व जीवनशैलीतील सकारात्मक बदल स्विकारून जीवन आनंदी ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.आवश्यक गोष्टींचे पालन करीत वैचारीक संतुलनाने प्रसन्न जीवनाची उपलब्धी हाच यशाच्या दिशेने जाण्याचा राजमार्ग आहे.असे प्रतिपादन अकोल्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे वृत्तविद्या पदविकाधारक केंद्रीय सहसचिव डॉ.अनुपकुमार राठी यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकारमहासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या शिरस्त्याप्रमाणे प्रत्येक पदाधिकाऱ्याचा सन्मान म्हणून आयोजित जुलैमधील ११व्या मासिक विचारमंथन मेळावा त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.राठी यांचे सोबतच रोटरीचे दुसरे माजी अध्यक्ष,समाजसेवी अशोककुमार पंड्या व पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे झालेल्या या कार्यक्रमात संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून आगामी डिसेंबरमध्ये आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ व १२ पानांच्या दिनदर्शिका प्रकाशन उपक्रमाची माहिती दिली.संघटनेची आवश्यकता व प्रत्येक सभासदांसाठी तिचे असलेले महत्व अधोरेखित करून संघटनकार्यात सक्रिय होण्याचे व पत्रकारांसाठी संघटनेच्या असलेल्या कार्याची माहिती प्रसारीत करण्याचे आवाहन सभासदांना यावेळी केले. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक गाडगे बाबांना वंदन करण्यात आले आणि जयंतीनिमित्त झुंजार पत्रकार स्व. लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यात आले.प्रसंगी डॉ.अनुपकुमार राठी,अशोककुमार पंड्या व अॕड.राजेश जाधव यांचा सन्मानपत्र, शाल व वृक्ष देऊन कार्यगौरव करण्यात आला.
केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांचे संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमात केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,मार्गदर्शक प्रा.राजाभाऊ देशमुख,प्रा.डॉ.संतोषकुमार हूशे,कादंबरीकार पुष्पराज गावंडे,मा.ज्युडी.मॕजि.अॕड.नितीन अग्रवाल,संदिप देशमुख,जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर,उपाध्यक्ष मोहन शेळके,मंगेश चऱ्हाटे,सतिश देशमुख,सौ.दिपाली बाहेकर,प्रा.मनोज देशमुख,रविन्द्र देशमुख,व ईतर सभासद उपस्थित होते.आभारप्रदर्शंन श्री राजेन्द देशमुख यांनी केले.