अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांसाठी विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर निरंतर राबवले जात आहेत . .24 ऑगस्ट २०२५ रोजी इंद्रप्रस्थ भवन येथील दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या कला प्रदर्शनीला आमदार साजिद खान पठाण यांनी सदिच्छा भेट दिली . डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या विविध पूजा साहित्य व कलात्मक वस्तूंचे निरीक्षण त्यांनी करून संस्थेच्या कार्याचा गौरव केला . डॉ विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन समाजाला भरीव योगदान देत आहे . संपूर्ण भारतात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला दिव्यांगांच्या शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी उत्कृष्ट कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले . अकोले करांनी या संस्थेला सर्वत्र मदत करावी त्याचबरोबर स्वतः मी सुद्धा या संस्थेच्या कार्याला समर्पित असून शासनाकडून प्रत्यक्षात सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले . यावेळी दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या अगरबत्ती व विविध वस्तू आमदार साजिद खान पठाण यांना डॉ.विशाल कोरडे यांनी भेट म्हणून दिल्या . संस्थेच्या सदस्य अस्मिता मिश्रा यांनीही दिव्यांग सोशल फाउंडेशन ची माहिती आमदार साजिद खान यांना दिली . यावेळी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अनामिका देशपांडे, नेहा पलन, तनवी दळवे, नीलू बंसल, दीपा शुक्ला विजय कोरडे व गणेश सोळंके उपस्थित होते .