गावातील व डोक्यातील अंधश्रद्धा रुपी घाण स्वच्छ करून मनाच्या शांती करिता भागवत सप्ताहाचे आयोजन होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. मौजा गांगलवाडी (ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर) येथे हनुमान मंदिर देवस्थान च्या वतीने सात दिवसीय श्रीमद भागवत सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी आम.डॉ.नामदेवराव उसेंडी,जेष्ठ काँग्रेस नेते हसनअली गिलानी, गड.जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, कृषी उ.बा.स.ब्रम्हपुरी अध्यक्ष प्रभाकरजी सेलोकर, माजी जि.प.स. प्रमोद चिमुरकर, माजी प.स.उपसभापती ठवकर ताई, माजी सरपंच भोयर, पो.पा.भोयर साहेब, राहुल ठवकर, ह.भ.प.मसराम ताई, ह.भ.प.वाडगुरे ताई सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गावातून भजन दिंडीच्या माध्यमातून प्रभातफेरी काढून गावातील संपूर्ण वातावरण भक्तीमय करण्यात आले.
भागवत सप्ताहाचे संपूर्ण आयोजन गावातील युवकांनी केले असून हे बाब इतरही गावातील युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.