वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) महसूल विभागाकडून देण्यात येणारे जात प्रमाणपत्र,डोमीसाईल प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला,नॉन क्रिमीलेअर रहिवाशी नागरिक प्रमाणपत्र,आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्र व दाखले कमी वेळेत मिळावेत यासाठी शॉर्टकट शोधला जात होता.पालकांची गरज लक्षात घेऊन दलाल त्यातून पिळवणूक करीत होते. यावर कायमस्वरूपी प्रतिबंध बसावा आणि शॉर्टकट बंद व्हावेत यासाठी आता महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाकडून निर्देश प्राप्त झाले आहे. सेतू विभागात फिफो प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.ही प्रणाली फस्ट इन फर्स्ट आऊट या तत्वावर काम करते.त्यामुळे पहिला दाखला जोपर्यंत निकाली निघत नाही, तोपर्यंत दुसरा दाखला निकाली निघणार नाही. त्यामुळे ज्याचा अर्ज आधी आला त्यालाच योग्य पडताळणीनंतर दाखला दिला जात आहे. फक्त वैद्यकीय कारण असल्यासच अशा अर्जांना पहिला प्राधान्यक्रम आहे.
ऑनलाइन प्रणाली असल्यामुळे दलालांना यामध्ये स्थान नसणार आहे. तसेच सेतूकडून हस्तक्षेप थांबणार आहे.सेतुमधून लवकरच काम करून देतो, असे म्हणून कोणीही अतिरिक्त पैसे घेऊ शकणार नाही. नागरिकांनीसुद्धा पैसे देऊ नये.कारण काम हे नियमानुसारच होणार आहे. अशी माहिती रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी दिली.