कारजा-येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येेथिल बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दिनांक 02 नोव्हबर 2023 रोजी दुपारी 1:00 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय कारंजा अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ केंद्रा व्दारा श्री बाबासाहेब धाबेकार विद्यालय यावर्डी येथिल 85 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थित करण्यात आली.
सदर तपासणी करीता राष्ट्रीय बाल स्वास्थ केंद्र कारंजाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ भेंडे व डॉ. प्राजक्ता धकाते तसेच ए.एन. एम अनिता राठोड उपस्थित होते.
डॉ. नवनाथ भेंडे यांनी आरोग्य तपासनी करतांना विद्यार्थ्यांना असलेल्या किरकोळ आजारची माहिती व प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले.मानवी जीवनातील आरोग्याचे महत्व मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यावेळी शाळेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्म. व विद्यार्थी उपस्थित होते.