अकोला -डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृह परिसरात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पूजन मिठाई वाटून मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे, प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र, तर प्रमुख अतिथी थैलेसिमिया सोसायटी अकोला अध्यक्ष हरीश अलीमचंदानी,भाजपा जिल्हा सदस्य संजय चौधरी,गजानन गोलाईत हे होते, यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घरघरात पोहचविण्यासाठी संकल्प करण्याचे आव्हान डॉ ओळंबे यांनी तर सर्व धर्म समभाव जोपसण्याचे आव्हान हरीश भाई यांनी केले .
कार्यक्रमाचे आयोजन अनुसूचित जाती मोर्चा माजी अध्यक्ष गणेश मानकर यांनी केले होते, तर प्रस्ताविक संतोष चाटी,संचालन राजकुमार सिरसाट तर उपस्थितांचे आभार गणेश ठाकूर यांनी मानले कार्यक्रमाला प्रेम मानकर, श्री मानकर, सचिन काकड, आशिष शर्मा, रवी जैन, प्रभाकर वानखडे, यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.