जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील देशपूर (कूरंजा) येथे वाघाच्या हल्ल्यात इसमाचा बळी गेल्याची घटना आज ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ठेमाजी आत्राम (५८) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार, देशपूर येथील ठेमाजी आत्राम हे आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता गुरे चारतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला व काही अंतरापर्यंत फरकडत नेऊन त्यांना ठार केले.
घटनेची माहिती गावातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळ गाठून पाहण्यास गर्दी केली होती. तसेच यासंदर्भात माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.
आरमोरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला असून नागरिकांकडून वारंवार नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. अजून किती बळी गेल्यावर वनविभाग वाघाला जेरबंद करणार असा प्रश्न नागरिक विचारात असून रोष व्यक्त करीत आहे.