अकोला - विविध जाती, धर्म, भाषा,प्रांत यामध्ये विखुरलेल्या भारताला एक संघ ठेवण्यासाठी सर्वोदय कार्यकर्ते सदैव धडपडत आहेत. राष्ट्रीय एकात्मता अखंड ठेवण्यासाठी महात्मा गांधींच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले.
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमीत्त आयोजित व्यसनमुक्ती जागर कार्यक्रमात बोलत होते. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय तिडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुशीला मळसणे,कला शाखाप्रमुख डॉ. अर्चना पोटे, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. अस्मिता बढे, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. श्रीकृष्ण तराळे व सांस्कृतिक प्रमुख प्रा. रूपाली सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजना नंतर रोपट्यांना जलार्पण करून कार्यक्रमाची पर्यावरणपूरक सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.अर्चना पोटे यांनी करून दिला. कमी रामराव पाटेखेडे यांनी व्यसनमुक्ती वर कविता सादर करून ज्ञानरंजन केले.
धार्मिक कडवेपणा वाढणे, विज्ञान विरोधी मानसिकता वाढणे, अतिरेकी व्यक्तिवाद वाढणे देशासाठी घातक ठरू शकते. ज्ञानेंद्रियांना अविवेक आणि अंधश्रद्धेची काजळी चढणार नाही यासाठी महात्मा गांधींचा सर्वोदय विचार मना मनात रुजवण्याची गरज आहे. तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीनतेला आवर घालण्यासाठी नशाबंदी मंडळामार्फत व्यसनमुक्ती सप्ताह राबवीला जात असल्याची माहिती बबनराव कानकिरड यांनी दिली.
महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा,शिस्त व बंधुभाव या मूल्यांची जोपासना करण्याचे आवाहन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय तिडके यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या संकल्पनेतुन महात्मा गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.सुशील जाधव यांनी केले. कार्यक्रमाला सर्वोदय व नशाबंदी मंडळाचे कार्यकर्त्यांसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येत मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....