मा. आम. सचिन अहिर सरचिटणीस भरतीय कामगार सेना यांच्या नेतृत्वात राज्यातील ग्रामपंचायत कामगाराचा दिनांक:- १ जुलै २०२४ ठिक दुपारी १२:०० वाजता आझाद मैदान मुंबई येथे विधानसभेवर भव्य मोर्चा निघणार आहे.
भव्य मोर्चामध्ये ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या खालील मागण्या
१) ग्रां. पं.कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे
२)ग्रां. पं.कर्मचाऱ्यांनानिवृत्ती वेतन लागू करणे
३)ग्रां. पं.कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे
४)ग्रां. पं.कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटन (इ. पी. एफ.) या कार्यालयात करणे
५)ग्रां. पं.कर्मचाऱ्यांनासुधारित किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी लगलेली वसुलीची जाचक अट रद्द करणे
६)ग्रां. पं.कर्मचाऱ्यांना आकृतीबंधात सुधारणा करणे
७) जिल्हा परिषद सेवेत ग्रां. पं.कर्मचाऱ्यांमधुन एकुण रिक्त पदाच्या १०%प्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ चे पदावर नियुक्ती देणे.
८) माहे ऑगस्ट २०२० ते मार्च मार्च २०२२पर्यंत थकीत वेतन तात्काळ अदा करणे.
इत्यादी मागण्याकरीता आझाद मैदान मुंबई येथे विधानसभेवर ग्रां. पं.कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा धडकणार आहे. तरी राज्यातील ग्रां. पं.कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या भव्य मोर्चात सहभागी व्हावे. असे आहवान श्री.विलास कुंमरवार राज्याध्यक्ष भारतीय कामगार सेना( एन जी.पी.५८२५)यांनी केले आहे.