ओबीसी युवा नेते महेश कोलावार यांनी माजी राज्यमंत्री आ.बच्चू कडू यांची सदिच्छा भेट घेतली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण,इतर मागासवर्ग व विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण राज्यमंत्री तथा दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ( कॅबीनेट मंत्री दर्जा) आ.बच्चू कडू हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता ओबीसी युवा नेते महेश कोलावार यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काही प्रमुख विषयांवर चर्चा करत स्वत: पुढाकार घेऊन सहकार्य करण्यास विनंती केली आहे.यावेळी बच्चू कडू यांनी योग्य सहकार्य करणार असे आश्वासन दिले.