वाशिम : जिल्हा परिषद,वाशिम अंतर्गत अनुकंपाधारकांची डिसेंबर 2023 अखेरची प्रतिक्षा यादी www.zpwashim.in या संकेतस्थळावर व सामान्य प्रशासन विभाग,जि.प.वाशिमच्या नोटीस बोर्डवर उपलध्द आहे. या यादीवर संबंधित उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास आदेशाच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सामान्य प्रशासन विभाग, जि.प.वाशिम येथे हस्तलिखीत पुराव्यासह नोंदविणे आवश्यक आहे. विहीत कालावधीनंतर आक्षेप प्राप्त झाल्यास या आक्षेपावर विचार करण्यात येणार नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.