अकोला:- व्याळा प्रभाग बाळापूर मधील सावित्रीबाई महिला प्रभाग संघाच्या वतीने जागतिक महिला दिन व प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभागसंघ अध्यक्षा जयश्रीताई खारोडे आणि तालुका अभियान व्यवस्थापक श्री नितीन हरने सरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली त्यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई वझीरे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली त्यावेळी वर्षाताई मार्गदर्शन केले कि महिलां प्रत्येक कार्यात पुढे असायला पाहिजे आणि ती आपल्या पायावर उभी असायला पाहिजे, गावातील ग्रामसंघाना कार्यालय मिळण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच तालुका व्यवस्थापक श्री घनश्याम धनोकार सरांनी उमेद अभियाना बाबत माहिती दिली तसेच महिलां नेहमी प्रत्येक कार्यात अग्रेसर असतात, त्यांनी अजून व्यवसाय क्षेत्रात सुद्धा जास्त प्रमाणात सहभागी घ्यावा या बाबत मार्गदर्शन केले तसेच प्रभागसंघ लिपिका पूनम ताई दामोदर यांनी प्रभागसंघ लेखा वार्षिक निधीबाबत माहिती दिली तसेच प्रभाग समन्व्यक गोपाल भाकरे यांनी प्रभागसंघ मार्फत सुरु झालेली स्मार्ट कंपनी चे पहिला टप्पा व्यवसाय सुरु करण्याबाबत माहिती दिली आणि प्रभागसंघाचे आवश्यक विविध ठराव घेण्यात आले तसेच महिलांचे आरोग्य तपासणी कॅम्प गुरुदेव सेवा मंडळ तालुका अध्यक्ष श्री प्रदीप गिऱ्हे यांच्या आयोजनातून घेण्यात आला, गावातील महिलांनी आरोग्य तपासणी केली तसेच गायत्री बालिकाश्रम संस्था मलकापूर अकोला संचालिंका यांनी महिलांना संस्था बद्दल माहिती दिली तसेच त्यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची, निंबू चमचा खेळ घेण्यात आला आणि विजेता महिलांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यावेळी प्रभागसंघ पदाधिकारी जयश्रीताई खारोडे व संध्याताई बोचरे, प्रभाग समन्व्यक पारस मनोज वैध, ग्रामसंघ पदाधिकारी, कॅडर आणि गटातील महिला हजर होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखाताई लौटे यांनी केले.