अकोला : दैनिक विश्वजगतच्या दि.17 ऑगष्टच्या पहिल्या पानावरील, *महाराष्ट्र शासनाने "सामाजिक-कार्यकर्त्याची"उपेक्षा करू नये." या बातमीबद्दल अकोट निवासी,महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त सप्तखंजेरी प्रबोधनकार, सत्यपाल महाराज शिरसोलिकर यांनी आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी असलेले महाराजांचे अनुयायी ज्येष्ठ दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांचे अभिनंदन केले असून,दैनिक विश्वजगतचे मुख्यसंपादक गजाननराव काटे यांचे आभार व्यक्त करतांना, अत्यल्प कमी वेळात,आपल्या सामाजिक जनजागृती करणाऱ्या दैनिक विश्वजगतने उत्कृष्ट रचना, ताज्या व परखड बातम्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळविल्या बद्दल विशेष कौतुक व गुणगौरव करीत शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच सामाजिक कार्यकर्त्याच्या भविष्याची ही दैनिक विश्वजगतची बातमी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव आणि आयुक्तांना दाखविणार असल्याचे म्हटले आहे.