दुचाकी चोरी (Stolen Bikes) प्रकरणात शहर गुन्हे शाखेला आणखी एक आरोपी गवसला असून दुचाकी चोरीच्या असल्याची माहिती असूनही त्या कमी पैशात विकत घेणार्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली व त्याच्याकडून पुन्हा एक दुचाकी जप्त केली.
गुरूवारी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बिस्मिल्ला नगरातील मोटार सायकल चोरी करणारा 19 वर्षीय आरोपी तौसिफ खान अनसार खान याला सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्याला सखोल विचारपूस केली असता त्याने पीडीएमसी हॉस्पिटलच्या मागील परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने बडनेर्यातील चमन नगर येथील हाफीसाहब यास विकल्याचे सांगितले. मोहसीन अहेमद उर्फ हाफीसाहब याने मोटारसायकल चोरीच्या आहेत, अशी माहिती असतांना सुद्धा तौसिफकडून कमी किमंतीमध्ये खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. यावरून 30 वर्षीय मोहसीन अहेमद उर्फ हाफीसाहब जमील अहेमद याला अटक करून त्याच्याकडून पुन्हा एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. अशा एकूण गुन्हे शाखेकडून 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत