ब्रम्हपुरी :- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यात महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटेक्निक च्या अंतिम वर्ष्यातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या अनिकेत टेकाम याने 77.89 टक्के मार्क घेऊन महाविद्यालयातुन प्रथम तर कु.आचल चनांवार 76.00 टक्के गुण घेऊन द्वितीय,कु.एकता मेहंदाळे 75 टक्के गुण तृतीय आली. विद्यूत अभियांत्रिकी मधील मुकुल सयाम 73.28 टक्के गुण घेऊन विभाग मधून प्रथम,तर द्वितीयकु.कोमल भाजीपाले 74.25 टक्केआणि तृतीय वैभव बोदेले 73.50 टक्के. यांच्या यशाबद्दल संस्थेच संचालक श्री.देवेंद्र पिसे तसेच प्राचार्य सुयोग बाळबुधे सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक,शिक्षक-शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.