दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्री. किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय कारंजा (लाड) येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय हे कारंजा शहरातील सर्वात जुने व प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. मागील ६० वर्षापासून हे महाविद्यालय अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवस्था, कृषी, उद्योग, सेवा, क्रीडा, कला व संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रात देश, विदेशात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. ही बाब महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यामुळे या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी श्री. किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांचे संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. रविवार, दिनांक १३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १० वाजता दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोलाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यकारिणी सदस्य तसेच कारंजा नगरीतील सुपरीचीत व्यक्तीमत्व डॉ. अजयजी कांत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोलाचे मानंद सचीव पवनजी माहेश्वरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय कोडापे यांनी केले आहे. या मेळाव्याचे संपूर्ण आयोजन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, कारंजा नगरीचे माजी नगराध्यक्ष, संजय काकडे, उपाध्यक्ष ॲड. फिरोज शेकुवाले, सचीव महेंद्रजी लोढाया, सहसचिव ॲड.दिगंबर पिंजरकर, कोषाध्यक्ष, समीर जोहरापूरकर, समन्वय डॉ. बलजीत कौर ओबरॉय, डॉ. सुनील राठोड यांनी केले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिली आहे .