स्व.सोनाली चारथळ यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त
केंद्रप्रमुख रामेश्वर चारथळ यांच्यावतीने पोहा, बेलमंडळ आणि वालई येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील एकूण 150 विद्यार्थ्याना शैक्षणीक साहित्य व खाऊ असलेल्या किटचे वितरण करण्यात आले.28 डिसेंबर रोजी पोहा येथील जिल्हा परिषद शाळेत यानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला केंद्रप्रमख रामेश्वर चारथळ व त्यांची मुलगी तनिष्का चारथळ व पत्रकार ज्ञानेश्वर घुडे,पोहा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रकाश राठोड, शिक्षीका सुनीता दहापुते उपस्थित होते.याठिकाणी या सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.शैक्षणिक साहित्य वितरणाचा पोहा येथील कार्यक्रम आटोपल्यावर केंद्रप्रमख रामेश्वर चारथळ यांनी आपल्या मुलीसह बेलमंडळ आणि वालई येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्याना शैक्षणीक साहित्य व खाऊ असलेल्या किटचे वितरण केले.
बेलमंडळ येथील वितरण कार्यक्रमाला मुख्याध्यापक कैलास अंधारे आणि वालई येथील कार्यक्रमाला मुख्याध्यापक मुरलीधर राठोड, शिक्षिका पुनम तराळे उपस्थित होते. दरम्यान
केंद्रप्रमख रामेश्वर चारथळ यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनातून जी सामाजिक बांधिलकी जपली त्यासाठी त्यांचें पंचायत समितीच्या शैक्षणीक वर्तुळात कौतुक होत आहे.