वाशिम:-
सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर मंत्रालय स्तरावरून,जिल्ह्यात शासकीय निमशासकिय समित्यांचे गठनच करण्यात आलेले नाही.त्यामुळे लोककलावंताना वृद्धापकाळात जीवन जगण्याकरीता,दरमहा वृद्धापकाळ कलाकार मानधन देणारी,सांस्कृतिक विभागाची बरखास्त आलेली "जिल्हा वृद्ध साहित्यिक कलाकार निवड समिती"नव्याने स्थापन होऊ शकली नाही.या कारणाने जिल्ह्यातील हजारो कलाकाराचे मानधन मिळविण्यासाठीचे अर्ज, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद येथे,पाच वर्षापासून धुळ खात पडलेले असल्याने तसेच कलाकार व निःस्वार्थी समाजसेवकाच्या इतरही योजना प्रलंबित राहील्या असल्याने,प्रजासत्ताक दिनानिमित्त,बुधवार दि.24 जानेवारी 2024 रोजी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड) च्या वतीने,लोक कलावंताचे भव्य असे "एकदिवशीय क्रांतिकारी धरणे आंदोलन" करण्यात आले असून,याबाबत अधिक वृत्त असे की,
1)कलाकाराचे मानधन महागाईला अनुसरून,दरमहा किमान पाच हजार रुपये करावे.
2)लोकप्रतिनिधीची जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समिती स्थापन करावी.
3)समितीमध्ये राजकीय नेत्यांना नव्हे तर लोककलावंताना प्रतिनिधीत्व मिळावे.
4)कलाकाराचे गेल्या पाच वर्षातील मानधनाचे अर्ज निकाली काढून दरवर्षी शंभर प्रमाणे पाचशे कलाकारांना मानधन सुरु करावे.
5) लाभार्थी मृतक कलाकाराच्या वारसांना मानधन सुरु करावे.
6) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून,दिल्या जाणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार , लोकशाहिर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुरस्कार,कर्मविर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,संत रविदास महाराज पुरस्कार आदी गेल्या पाच वर्षाचे पुरस्कार सोहळे आयोजित करण्यात यावेत.
7) सर्व महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थींना दरमहा पाच हजार रुपये मानधन सुरु करण्यात यावे.
8)महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी यांना रेल्वेमध्ये मोफत प्रवासाची सवलत मिळावी.
9)सप्तखंजेरी प्रबोधनाचे पुरस्कर्ते सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांना सांस्कृतिक विभागाचा "महाराष्ट्र - भूषण" देण्यात यावा.

आदी मागण्यांकरीता,स्वतः महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त असलेले आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात भव्य क्रांतिकारी धरणे आंदोलन करण्यात आले असता, सदर आंदोलनात संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील लोककलावंत बहुसंख्येने सहभागी झाले होते.शिवाय आमदार अमित झनक,मनसेचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ किडसे-उपाध्यक्ष अमोल लुलेकर,मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे,प्रसिद्धी प्रमुख शुभम घोडे,संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ईस्माईल खान हयातखान पठाण,विभागीय शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांच्या वतीने प्राचार्य अरुणराव सरनाईक,राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कारंजाचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया,प्रदिप वानखडे,राजीक शेख, सेवादल काँग्रेसचे डॉ.विशाल सोमटकर,आरपिआय (आठवले गटाचे) हिवराळे,पिरीपाचे अध्यक्ष विलास राऊत,जिप सदस्या चौधरीताई, जि.प.समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे इत्यांदीनी आंदोलनाला भेट देऊन जाहिर पाठींबा दिला.तर परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष पूर्णाजी खंदारे आपल्या कलावंतासह पूर्णवेळ सहभागी झाले होते.आंदोलनाला महाराष्ट्र शासनाचे दलित मित्र आणि समाजभूषण पुरस्कारार्थी रामबकस डेंडूळे,प्रकाश गवळीकर,शिवमंगल राऊत,शाहीर संतोष खडसे इत्यादी हजर होते.यावेळी सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने किंवा आमदाराने आंदोलनाची दखल न घेतल्याने,"सत्ताधारी नेत्यांना निवडणूका आल्या म्हणजे केवळ प्रचारासाठी आणि मतासाठी लोककलावंत दिसतात.मात्र त्यांच्या रास्त मागण्याकरीता सत्ताधारी आमदार हे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री,पालकमंत्र्यांना भेटून आणि विधानसभेत लक्ष्यवेधी मांडून कलावंताचे प्रश्न सोडवीत नसल्याची खंत" पत्रकार संजय कडोळे आणि कलावंतानी बोलून दाखवीली.याउलट विरोधी पक्षाचे मालेगाव-रिसोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी मात्र आंदोलनाची दखल घेऊन,शासनाने लोककलावंताच्या तुटपुंज्या मानधनात वाढ व्हावी.निवड समितीचे गठन होऊन कलाकाराचे मानधनाचे प्रलंबीत अर्ज निकाली निघून त्यांना मानधन सुरू व्हावे.आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळा व्हावा.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याबाबत आश्वासित केले. आ.अमित झनक यांच्या भेटी मुळे आंदोलकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

आंदोलनामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेडोपाडीच्या शेकडो कलावंताची सकाळच्या (पुरी भाजी)भोजनाची व्यवस्था, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दानशूर सेवाव्रती तथा पत्रकार निलेश सोमाणी आणि दुपारच्या भोजनाची व्यवस्था राष्ट्रीय सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल सोमटकर यांनी केली होती.शांती,सयंम व अतूट विश्वासाने केलेल्या आंदोलनात शेकडो कलावंतानी आपल्या कलेचे प्रदर्शनही केले.सौ.सिमा सातपुते,सौ.कृपा ठाकरे,सौ.शारदा भुयार,सौ.एकता गायकवाड,सौ.छाया गावंडे यांनी वृद्धाश्रमाचा बिमोड होऊन मुलांनी आई वडिलांचे पालनपोषण करावे.यावर प्रकाशझोत टाकणारी नाटीका सादर केली.रोहीत महाजन,गोपाल मुदगल,प्रतिक हांडे,सुरेश हांडे,कैलास हांडे, अशोक हांडे यांनी गोंधळ जागरण लोककला सादर केली.शेषराव इंगोले,कांताबाई लोखंडे,देवकाबाई इंगोले,सुनंदा मात्रे,अन्नपूर्णा लोखंडे,इंदिरा मात्रे, पद्माबाई लोखंडे यांनी शाहू फुले आंबेडकरांच्या गीताचे गायन केले.मंगरूळपिरचे आराधी मंडळ संध्या धनवे,मोहिनी गीरी,आशा कोळकर,निता गीरी,प्रमिला कोळकर,चंद्रकला कोळकर, मनकर्णा भोसले,ललिता गायकवाड,सुधाताई डाके,शोभा शिंदे,द्वारका खडसे,इन्दुबाई माने आदींनी पारंपरिक आराधी कला सादर केली.आंदोलनाच्या यशस्वीतेकरीता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे नंदकिशोर कव्हळकर, लोमेश पाटील चौधरी,हभप पांडूरंग महाराज ज्येष्ठ किर्तनकार,शाहीर देवमन मोरे, डॉ.ज्ञानेश्वर गरड, इम्तियाज लुलानिया,अश्विन जगताप, ज्ञानेश्वर खंडारे,माजी सरपंच प्रदिप वानखडे,विजय खंडार,उमेश अनासाने,रोहीत महाजन,निळकंठ काळे,सुखदेव गाडेकर,देवराव गजभार,संतोष केळकर,केशव बोंडे, बाळकृष्ण काळे,श्रीकृष्ण नेमाने,लक्ष्मण इंगळे,सुरेश आमटे मंगरूळपिर,विश्वनाथ इंगोले सनगाव,द्वारकाबाई सावके तोरनाळा,दामोदर जोंधळेकर, सुभाष काळेकर,खडसे, करण पवार ,शाहीर भगवान कांबळे, प्रकाश खडसे,आशिष खडसे, मदन भगत,श्रीराम भगत, यशवंता खडसे,उत्तम भगत, गणेश राठोड,भिवाजी भगत, पांडूरंग इंगोले,भिकाजी भगत संतोष कांबळे,माणिक भगत, बन्सी राठोड,पांडूरंग राठोड, सुंदरा बाई इंगोले,नंदाबाई इंगोले, अनिताबाई भगत उमरा (शम.)आदींनी परिश्रम घेतले.
शेवटी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन,जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना पाठविण्याकरीता आपल्या मागण्याचे निवेदन दिले.यावेळी समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक लहाडके उपस्थित होते. त्यानंतर माध्यमाशी बोलतांना कलावंतानी इशारा दिला की, "शासनाने आमच्या ह्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या गांभिर्याने पूर्ण केल्या नाही तर पुढील आंदोलन तिव्र करून, आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकावा लागेल. तसेच पुढील आंदोलन आम्हाला आमदार खासदार यांच्या निवासस्थानावरच करावे लागेल.व त्याची जबाबदारी आमदार खासदार यांचीच राहील."असे वृत्त प्रसिद्धी पत्रकातून संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....