नागभिड :-
पोलीस स्टेशन नागभिड येथे जागतिक महीला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यातील कार्यरत महीला कर्मचारी व अमलदार यांना पूर्ण दिवस संपूर्ण पोलीस ठाण्याची जबाबदारी देउन त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
दरवर्षी 8 मार्च रोजी संपूर्ण जगात महीलांच्या सन्मानार्थ जागतिक महीला दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमीत्ताने पोलीस स्टेशन नागभिडचे ठाणेदार योगेश घारे यांनी पोलीस ठाण्यातील कार्यरत सर्व महीला अधिकारी व अमलदार यांचे पूष्पगुच्छ व भेटवस्तू देउन शुभेच्छापूर्ण सत्कार केले. महीला पोलीस यांना पूर्ण पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला. तसेच इतर कार्यरत महीला पोलीस कर्मचारी नापो / सुजता उईके,आरती गेडाम, माधुरी कष्टि,आशा वाकडे,करिश्या भांडे, अशा नियमित कर्तव्याचे चार्ज देण्यात आले. आज संपूर्ण दिवस पोलीस ठाण्याची जबाबदारी सर्व महीलांना देण्यात येउन त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात पोस्टेचे सर्व पोलीस अधिकारी सु,पो,नि,वैभव कोरवते,पो,उप,नि,निलेश वाडीवा,डि,जे,बारसागडे, साखरे,संजय पोंदे, सुधाकर माकोडे, अमंलदार कुंदन वाघमारे, कूणाल पतरंगे,गिरीधर आंबोरकर,फिरोज हंनवते, गोकूल कुमराम,लंकेश राहुत रुपेश मल्लेवार,तसेच पोलीस व होमगार्ड कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....