कारंजा : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत शुक्रवारी दि ०९ सप्टेंबर रोजी रात्री, आनंदोत्सवात विसर्जन मिरवणुक सुरु असतांना, कर्तव्यावर बंदोबस्ता करीता असणार्या पोलीसांकडून जो प्रकार घडला . त्याचे समर्थन निश्चितच होऊ शकत नाही. पोलिसांनी केलेली ही दंडूकेशाही अमानवी अशा स्वरूपाची होती. कारंजा शहराच्या शांती सलोख्याला दस्तुरखुद्द पोलिसांकडूनच गालबोट लागल्यामुळे या घटनेचा सर्वत्र तिव्र निषेध व्यक्त होत आहे. भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल सुरेशराव गढवाले हे जबाबदार कार्यकर्ते असतांना त्यांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले असी तक्रार त्यांचे वडील सुरेश कृष्णराव गढवाले यांनी केली आहे. अधिक चौकशी कारंजा शहर पोलिस स्टेशन करीत आहे. कोणतेही सण उत्सव मिरवणूका असतांना , आधीच जर पोलिस प्रशासनाने, मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक व राजकिय कार्यकर्ते यांची ओळख करून घेऊन, त्यांना पोलिस स्टेशनकडून ओळखपत्र प्रदान केले असते तसेच पोलिसांनी कर्तव्य बजावत असतांना, शांती व सलोखा कायम ठेवून, प्रेमाने व सहानुभूतीने जर प्रकरण हाताळले असते तर असा प्रकार श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे दरम्यान घडलाच नसता एवढे मात्र निश्चित.