वाशिम : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तरुण क्रांती मंच व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था धनज बू च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकोडे सरचिटणीस विश्वास आरोटे व प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात राजे वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., पतंजली योग प्रशिक्षक सौ.दीपा वानखेडे ,सहयोग फाउंडेशनच्या सौ.संगीता इंगोले, समाजसेविका सौ.वृषाली टेकाळे ज्ञानेश्वरी सोळंके, पहिल्या महिला डॉक्टर सौ.मोनिका भागडे , आंतरराष्ट्रीय वास्तू विशारद सौ अर्चना मेहकरकर यांचा सत्कार अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपजिल्हाधिकारी कैलास देवरे पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष आयोजक निलेश सोमानी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके बालरोग तज्ञ डॉक्टर हरीश बाहेती,, उद्योजक गिरधारीलाल सारडा , उद्योजक देवेंद्र खडसे पाटील,अविनाश मारर्शीटवार पवन मिश्रा, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शाहू भगत एडवोकेट सुरेश टेकाडे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले यावेळी निलेश सोमानी व डॉक्टर हरीश बाहेती यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले.
उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाला खांद्याला खांदा लावून कार्य करीत असल्याचे सांगितले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक निलेश सोमानी यांनी केले.