कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)-- देशातील ईशान्य भागातील मणिपूर राज्यात,गेल्या तीन महिन्यांपासून प्रचंड हिंसाचाराच्या व नागरिकांवर जुलमी अत्याचाराच्या घटना सुरू आहेत.ह्या हिंसाचार दरम्यान काही समाजकंटकाकडुन दोन महिलांना पोलिसांच्या गाडीतून उतरवून विवस्त्र करुन त्यांच्या वर अत्याचार करण्यात आले हे कृत्य म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असुन या कायरता पुर्वक घटनेचा कारंजा लाड,शहर काँग्रेस कमिटीने निषेध करीत उपविभागीय अधिकारी मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एका निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे
मणिपूर हे पर्यटनाच्या दृष्टीने, आपल्या देशातील अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. अश्या या राज्यात सतत हिंसाचार होणे पर्यटनाच्या दृष्टीने योग्य नाही पर्यटन व गुंतवणुकी वर याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
गेले तीन महिने मणिपूर जुलमी अत्याचार आणि सततच्या हिसाचाराने ताणतणावात आहे. प्रचंड प्रमाणात जाळपोळीच्या घटना घडत असुन कित्येक नागरिक बेघर झाले आहे.तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू असलेल्या मणिपूर मध्ये नरेंद्र मोदी व अमित शहा यांना तेथील घटनेची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्याऐवजी ते अहोरात्र विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडण्यातच लागले होते,नरेंद्र मोदी व अमित शहा यांना व्देषाचे व नागरिकांना भयभीत करण्याचे राजकारण करावयाचे आहे. असेही निवेदनात म्हटले आहे
एवढ्या अक्षम्य व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या देशाच्या कोपऱ्यात घडतात.आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तोंड ही उघडत नाही.या घटनेवर पंतप्रधान या नात्याने ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. अत्यंत हदय पिळवून टाकणारी ही घटना असल्याचे मत कांग्रेस ने व्यक्त केले आहे
मणिपूर मधील हिंसाचार व महिलांवर होणारे अत्याचार आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत. याकरिता आपण केंद्र सरकारला कडक निर्देश द्यावेत.अशी मागणी काँग्रेसने केली आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीपभाऊ भोजराज होते.
तर निवेदनावर दिलीप भोजराज,कारंजा लाड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमीर खान पठाण,वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जैन जिंतुरकर, कारंजा लाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश लांडकर पाटील,कारंजा लाड शहर अल्पसंख्याक कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसुफ जट्टावाले,वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी पंचायत राज समितीचे अध्यक्ष अँड वैभव ढगे,वाशिम जिल्हा एन एस यु आय चे उपाध्यक्ष अक्षय बनसोड ,कारंजा लाड शहर भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रदिप भाऊ राऊत, सिध्दार्थ सावध,पांडुरंग बेलसरे, जमील शेख,तौसिफ खांन सरफराज खांन,शोएब पठाण, महंमद शाकीब,कनिराम जाधव व हंसराज इंगोले यांच्या सह्या आहेत.असे वृत्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जैन जिंतुरकर यांनी दिले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....