वरोरा: शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवसेनेचा समाजसेवेचा वसा जपला.
वरोरा येथील आनंदवनातील स्वरानंद येथील अंध , अपंग व कर्णबधिर विद्यार्थ्यांना अल्पोहराचे वाटप तसेच केक कापून अंध, अपंग वि्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला
आनंदवन येथील रुग्णालयातील रुग्णांची,तसेच वृद्धश्रमात देखील अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयत रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. बोर्डा येथील अहिल्यादेवी होळकर आश्रमात अल्पवहाराचे वाटप करण्यात आले.
भद्रावती तालुक्यात देखील विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर तालुक्यातील कडोली येथील ग्रामस्थांना छत्रीची वाटप , आरोग्यविषयक तसेच शैक्षणिकबाबी बाबत कुठल्याही अडचणी असल्यास जिल्हा संपर्क कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केली आहे.
यावेळी आनंदवन येथील विशेष कार्यकारी अधिकारी सदाशिवजी ताजने सर, माजी सैनिक मनोजराव जिवतोडे, युवासेना जिल्हाप्रमुख मनिष जेठानी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, तथा समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका, युवती सैनिक,उपस्थित होते.
मनिष भुसारी, वरोरा
आपल्या प्रतिक्रिया द्या....